समाज माध्यम आणि जबाबदारी

समाज माध्यमांसाठी कळकळीची विनंती करणाऱ्या एका वाचकाचे पत्र सविनय सादर.                                                                                 
      समाज माध्यमांद्वारे बरेच जण त्यांना कसे समाजभान आहे? हे सांगत असतात... शोषितांच्या व्यथा असतील... महिलांचे प्रश्न.. कामगारांच्या समस्या.. स्थलांतरित समाजाचे प्रश्न... खरंतर अनेक मुद्दे मांडतात. तसं ते खूप महत्त्वाच आहे. प्रश्न हे मांडलीच पाहिजे. प्रश्न मांडल्यामुळे समाजातील बुद्धीवंतांचा एक गट त्यामुळे सक्रिय होतो आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ उभी करतो. त्यामुळे नाही शंभर टक्के परंतु काही अंशी प्रश्नाला सामोरे जाणाऱ्या वर्गाला न्याय मिळत असेल परंतु बऱ्याचदा माहितीची सत्यता न तपासता समाज माध्यम ह्या बातम्यांचं रंजक, अति रंजक स्वरूप प्रदर्शित करून चळवळीला चुकीच्या दिशेने नेऊन ठेवतात.. समाज माध्यमांच्या अतिरंजित प्रसारामुळे यंत्रणेला बऱ्याचदा रोषाला सामोरे जावे लागते. तसं पाहिलं तर जातीच्या राजकारणावरून एखाद्या नेत्याला, पक्षाला बऱ्याचदा टार्गेट केले जाते. तो हिंदूचा चेहरा, तो तर मुस्लिम, तो पक्ष अमक्या जातीचा तमक्या  धर्माचा असं वादळ निर्माण करून समाजमाध्यम मजा बघत बसतात.. समाज माध्यमांनी खरंतर अतिशय जबाबदारीने वागले पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्तंभ माध्यम समूह... खरंतर माध्यमांनी स्वतंत्र असायला हव.. कोणाच्याही वैयक्तिक प्रभावाखाली न येता काम करायला हव.. पण दुर्भाग्य बऱ्याचदा माहितीची सत्यता न तपासता मनाची इमले उभे करत माध्यमांनी लोकांच्या मनात असहिष्णुता वाढवली आहे... हा लेखन प्रपंच करण्याचे कारण एकच भान ठेवून लेखन व्हायला हवे.. आपल्या चुकीच्या लेखन- प्रपंचामुळे काम करणाऱ्या यंत्रणेला, समूहाला, प्रशासनाला रोषाला बळी पडून काम करण्यात अडचणी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी... बाकी आपण खूपच सुज्ञ आहात त्यामुळे अधिक सांगणे नाही...लिहीत राहा ..दर्जेदार लिहा

                                          कळावे
                                     आपलाच वाचक

@रणजित कुऱ्हे ..(लेखकाचे सर्व अधिकार अबाधित आहे ..कोणीही पूर्व परवानगी शिवाय मजकूर कॉपी करू नये)

Comments

  1. अप्रतिम वर्तमान परिस्थिती वर्तवली आहे, साहेब तुम्ही,

    ReplyDelete
  2. खरं आहे सर. प्रत्येकाच्या हाती कोलीत आहे आणि प्रत्येकाची ते दुसऱ्याकडं फेकायची घाई आहे. वृत्तपत्र, मुद्रित माध्यमं समाज घडवायचं काम करतात असं म्हणतात. कारण कोणतीही माहिती तिथं खातरजमा केल्याशिवाय पुढं जावू दिली जात नाही. अनेक चाळण्या लागतात. अनेक विषयांवर अनेक दिवस काम चालतं, मग ते मांडले जातात. २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहीन्यांनी सबसे तेज च्या नादात याला थोडा धक्का लावला. आणि सोशल मिडियामुळं सगळ्यांच्या हाती कोलीत आलं. त्यातल्या त्यात विवेक असलेली माणसं चांगली हाताळणी करतात. समाज माध्यम निरिक्षरांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि ती एक स्वतंत्र डोकेदुखीही.

    ReplyDelete
  3. खरच भयाण वास्तव आहे हे.

    ReplyDelete

Post a Comment