Posts

दृष्टिकोन

दिवस मावळतीला आला.... दिवसभर काम करून सदानंद थकून गेला होता.. आता घरी जायचं आणि बायकोच्या हातचं पिठलं भाकर खायची ही एकच इच्छा त्याच्या मनात होती. दिवसभर कष्ट करणे आणि सुखाची भाकर संध्याकाळी खाणे हा त्याचा नीतिनियम होता.. सकाळी लवकर उठणे जनावरांचे शेण शेणकुर करून त्यांच्या खालची घाण साफ करायला त्याला मजा यायची..शेणकुर करून झाल्यानंतर दोन गाई , वासरू आणि आपल्या लाडक्या हौश्या आणि नंद्याला वैरण टाकून तो आंघोळीला बसायचा.. आंघोळीला बसण्यापूर्वी हलकेच दोन गाईंचे दूध काढून ठेवण्याच्या कामांमध्ये मंगा त्याला मदत करायची... आंघोळ झाल्यावरती देवाची पूजा करणे आणि सायकलवर टांग मारून डेअरीला विक्रीसाठी दूध घेऊन येणे... दुधाला इतकी फॅट लागली म्हणजे इतका भाव मिळेल... हे गणितही कधीकधी तो जुळवत बसत असे...पण आनंदी असणे आणि त्या क्षणांचा आनंद घेणे हे सदानंद न चुकता करत असे... कोणत्याही प्रकारचा खोटा गाजावाजा न करता हे काम करायला त्याला मजा यायची.. दूध घालून आल्यावर  घरी येणे परत जनावरांना चारा टाकणे आणि कामाला परत लागणं... शेतीच उरलेल प्रत्येक काम मग ते कोणतही असो करताना त्याच्या चेहऱ्यावर फक्त काम क...

कोविड 19 च्या सावटाखाली अनुत्तरीय प्रश्नाच्या भोवती गरोदर,स्तनदा आणि बालके

सहा वर्षाच्या पुढील बालकांच्या शाळा कधी सुरू कराव्यात? यावरून समाजातील पालक,शिक्षण तज्ञ,NGO प्रत्येक जण आपपल्या परीने बोलत आहे परंतु ;कोरोना काळात गरोदर,स्तनदा आणि सहा वर्षापर्यंतची बालक यांच्याबाबत जबाबदारीने कोणीही बोलायला तयार नाही. गरोदर माता सध्या किती मानसिक तणावातून जात असेल याची कल्पना नकळत कोणी केलीही नसेल. स्तनदा मातांचा ही बाबतीत हीच परिस्थिती.... मनात असंख्य प्रश्नांना समोर ठेवून या माता कोविड19 काळात दोलायमान स्थितीत जीवन जगत आहेत...      गरोदर, स्तनदा आणि सहा वर्षापर्यंत बालकांचा विचार करत असताना काही अनुत्तरीय प्रश्नांची चर्चा करणे त्यामुळे क्रमप्राप्त  झाले आहे.. @ गरोदर मातांच्या संबंधातील प्रश्न--   १) गरोदर माता या मुळात एका वेगळ्या मानसिक पातळीवरून प्रवास करत असतात... सद्य परिस्थितीत या मातांना संस्थागत प्रस्तुती करावी की करू नये या सारखे प्रश्न भेडसावत आहे.कोविड19ची लागण दवाखाने स्थित होऊ नये म्हणून गरोदर माता जरी जबाबदारीने वागत असली तरी बाळाला लागण तर होणार नाही ना एक अनामिक भीती तिला सतावत असल्याचे दिसते ... २) गरोदरपणा हा तसा मातृत्...

संघर्ष उद्याचा

      किर्र रात्र, रातकिडे ओरडत होते.. जणू काही तरी सांगायचा प्रयत्न करत असावे. सृष्टीतल्या त्या भयानक सत्या बद्दल तर बोलायचं नसेल ना त्यांना? उद्यासाठी काय वाढून ठेवलंय ?एवढा विचार कधीही न करणारा राकेशही विचारात गुंग झाला होता. कितीतरी वेळ असाच गेला अबोल्यात म्हणूया. जेव्हा प्रेयसी  सोबत असूनही प्रियकराकडे काहीच लक्ष देत नाही तेव्हा अचानकपणे प्रियकराने तिला चिमटा घ्यावा आणि तिने मग लागलीच रागात त्याच्याशी संवाद साधावा.. असंच झालं.. दिव्यापुढे बसलेला राकेश त्याच्या गुंगीतून जागा झाला तो पतंगाच्या झेपेने. प्रकाशाकडे धावताना तो पतंग त्याच्या चेहऱ्यावर येऊन धडकला आणि राकेश वर्तमानात परतला. कालपर्यंत कामाचा आनंद घेत जगत होता. आजच्या पुरत काम कराव उद्याचं उद्या बघू अशा प्रवृत्तीचा तो. दुसऱ्यांसाठी व्यवहारी ज्ञान नसलेला असेल; पण गरजेपुरतं कमवावं आणि खावं या भारतीय संस्कृतीच जतन करणारा खरा माणूस होता तो..पण! खरंच तुम्हाला संस्कृती जगवते का?कि खोट्या स्वप्नांच्या मागे धावून कमावलेलं इस्पितचं तुम्हाला जगवते हि बघण्याची कसोटी होती...आता पुढे काय वाढून ठेवलंय ते देवालाच माहित ...

समाज माध्यम आणि जबाबदारी

समाज माध्यमांसाठी कळकळीची विनंती करणाऱ्या एका वाचकाचे पत्र सविनय सादर.                                                                                         समाज माध्यमांद्वारे बरेच जण त्यांना कसे समाजभान आहे? हे सांगत असतात... शोषितांच्या व्यथा असतील... महिलांचे प्रश्न.. कामगारांच्या समस्या.. स्थलांतरित समाजाचे प्रश्न... खरंतर अनेक मुद्दे मांडतात. तसं ते खूप महत्त्वाच आहे. प्रश्न हे मांडलीच पाहिजे. प्रश्न मांडल्यामुळे समाजातील बुद्धीवंतांचा एक गट त्यामुळे सक्रिय होतो आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ उभी करतो. त्यामुळे नाही शंभर टक्के परंतु काही अंशी प्रश्नाला सामोरे जाणाऱ्या वर्गाला न्याय मिळत असेल परंतु बऱ्याचदा माहितीची सत्यता न तपासता समाज माध्यम ह्या बातम्यांचं रंजक, अति रंजक स्वरूप प्रदर्शित करून चळवळीला चुकीच्या दिशेने नेऊन ठेवतात.. समाज माध्यमां...