कोविड 19 च्या सावटाखाली अनुत्तरीय प्रश्नाच्या भोवती गरोदर,स्तनदा आणि बालके

सहा वर्षाच्या पुढील बालकांच्या शाळा कधी सुरू कराव्यात? यावरून समाजातील पालक,शिक्षण तज्ञ,NGO प्रत्येक जण आपपल्या परीने बोलत आहे परंतु ;कोरोना काळात गरोदर,स्तनदा आणि सहा वर्षापर्यंतची बालक यांच्याबाबत जबाबदारीने कोणीही बोलायला तयार नाही. गरोदर माता सध्या किती मानसिक तणावातून जात असेल याची कल्पना नकळत कोणी केलीही नसेल. स्तनदा मातांचा ही बाबतीत हीच परिस्थिती.... मनात असंख्य प्रश्नांना समोर ठेवून या माता कोविड19 काळात दोलायमान स्थितीत जीवन जगत आहेत...
     गरोदर, स्तनदा आणि सहा वर्षापर्यंत बालकांचा विचार करत असताना काही अनुत्तरीय प्रश्नांची चर्चा करणे त्यामुळे क्रमप्राप्त  झाले आहे..
@ गरोदर मातांच्या संबंधातील प्रश्न--
  १) गरोदर माता या मुळात एका वेगळ्या मानसिक पातळीवरून प्रवास करत असतात... सद्य परिस्थितीत या मातांना संस्थागत प्रस्तुती करावी की करू नये या सारखे प्रश्न भेडसावत आहे.कोविड19ची लागण दवाखाने स्थित होऊ नये म्हणून गरोदर माता जरी जबाबदारीने वागत असली तरी बाळाला लागण तर होणार नाही ना एक अनामिक भीती तिला सतावत असल्याचे दिसते ...
२) गरोदरपणा हा तसा मातृत्वाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु कोरोना काळात दिवसेंदिवस होणारी गंभीर परिस्थितीमुळे मातांमध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे दिसते.. या काळात मातांची मानसिक स्थिती भीतीने इतकी संवेदनशील झाली आहे की भविष्यात त्याचा परिणाम जन्माला येणाऱ्या बालकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होऊ शकतो... याबाबत सामाजिक विचार व्हायला हवा.
३)कोविड19च्या पडछायेत आपल्या बालकांचा जन्म होणार त्यामुळे बालकांच्या आरोग्य चांगले तर राहील ना ?त्याला काही धोका तर होणार नाही ना ? हे प्रश्न तिला सतावत आहे..
        प्रस्तुतीसाठी निवड करण्यात आलेला दवाखाना सुरक्षित तर आहे ना? डॉक्टर कोरोना रुग्णांच्या संपर्कात तर आले नसतील ना? या न संपणाऱ्या प्रश्नांमुळे आपण गरोदर पणा बद्दल घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य अशा विचारात बऱ्याच गरोदर माता दिसून येतात..

    दुसरीकडे स्तनदा माता पण कमीअधिक याच विचारात दिसून येतात. नुकत्याच बाळाला जन्म दिलेल्या माता तर प्रचंड मानसिक तणावातून प्रवास करत असल्याचे दिसून येते.. साधारणतः खालील प्रश्न त्यांचाही पिच्छा सोडत नाही.
१) आपण निवडलेल्या दवाखान्यात सुरक्षितता तर होती ना? मला काही धोका तर नसेल ना? बाळाला काही धोका तर नसेल ना? बाळाला भेटायला आलेले लोक covid-19 संपर्कातील तर नव्हते ना? हे प्रश्न तिला सातत्याने सतावत आहेत.
२) नुकत्याच जन्मलेल्या अभ्रकाची मुळात रोगप्रतिकारक्षमता कमी असते.. ही लहान मुले बऱ्याचदा निमोनिया, asphyxia किंवा श्वसनाशी  संबंधित व्याधींनी कधीकधी त्रस्त होतात.. पण covid-19 च्या  कालखंडामध्ये स्तनदा मातांना बऱ्याचदा आपल्या बालकांना covid-19 लागण तर झाली नसेल ना? यासारखे प्रश्न मनामध्ये उद्भवू शकतात.
३) मुलांना नित्यनियमाने होणारे लसीकरण देत असताना त्या ठिकाणी हजर असणारे लोक, कर्मचारी, आदी कोरोना रुग्णाच्या संपर्कात नसतील ना? या भीतीपोटी बालके भविष्यात लसीकरणापासून वंचित राहिली तर त्यात नवल वाटायला नको..
४) covid-19 च्या भीतीपोटी बऱ्याचदा माता बालकांना दवाखान्यात घेऊन जाण्यापेक्षा बालकी घरगुती उपचाराने बरे होईल या आशावादी पोटी बालकांना दवाखान्यात घेऊन जाणे टाळेल परिणामी जास्तीच्या समस्यांना सामोरे जाण्याची भीती आहे.
५) जन्मता कमी वजन असणारी बालके, दिव्यांग बालके, विशेष गरजा असणारी बालके यांच्याबाबत गुंतागुंतीचे प्रश्न हाताळणे ह्या काळात अवघड होणार असल्याचे जाणवत आहेत.

     या सोबतच सहा वर्षाच्या आतल्या मुलांच्या बाबतीत निर्माण झालेली काही प्रश्न खालील प्रमाणे आहेत...

१) covid-19 बाबत घरात होत असलेल्या चर्चेमुळे सहा वर्षाच्या आतल्या मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणार... लहान वयात त्यांच्या बालमनावर कोरला गेलेला हा संस्कार कोविड19 समस्येतून बाहेर निघाल्यावर ही मुले भविष्यात सामाजिक पातळीवर  स्वतःचे अनुकूलन करताना धडपडताना  दिसणार..
२) छोट्या स्नायूंचा विकास मंद होणार
३) बालकांच्या सामाजिक विकासावर कायमस्वरूपी परिणाम होणार..
४) 0 ते 6 वर्ष चा काळ बालकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे त्यांना या काळात पोषक वातावरण उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांचा विकास भविष्यात कसा होणार ?हे येणारा काळच सांगू शकतो. सामाजिक मूल्यांचा विकासही कसा होणार? याबाबतही बरेच प्रश्न निर्माण होत आहे..
     तरी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये गरोदर, स्तनदा व सहा वर्षाखालील बालकांच्या बाबत विचार होणे अपेक्षित आहे.. त्यांचे उदबोधन ,प्रबोधन कसे करता येईल याचाही सामाजिक पातळीवर विचार होऊन तशी कार्यवाही करणे अपेक्षित आहे... गरोदर व स्तनदा माता यांची मानसिक तयारी कशी करावी? 0 ते 6 वर्ष बालकांचे कोविड19 च्या काळामध्ये कसे व्यवस्थापन करावे? याबाबत पालकांमध्ये जाणीव-जागृती करण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे...

                                      @ रणजित कुऱ्हे
                           ranjitkurhe0@gmail.com

Comments